संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात हजारो भाविकांनी घेतले श्री गणेश दर्शन!

गणपतीपुळे : वैशाख कृष्ण चतुर्थी (संकष्टी चतुर्थी ) निमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात सोमवारी हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. उन्हाळी हंगाम तसेच शाळा, महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्या यामुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांसह भाविकांची देखील गेल्या काही दिवसांपासून वर्दळ वाढली आहे.

सोमवारी वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे श्रींच्या भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविकांनी दर्शन रांगांमध्ये शिस्तबद्धपणे उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतले.

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळे तर्फे मंदिरात श्रींच्या मूर्ती पुढे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानचे मुख्य पुजारी श्री. अभिजीत घनवटकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आरास केली होती.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE