लांजा : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यपदी लांजातील शिवसेनेचे ज्येष्ठ युवा नेते सुनील उर्फ राजू कुरूप यांची निवड झाली आहे. या निवडीने लांजात राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत होणार आहे. माजी पंचायत समिती उपसभापती, लांजाचे माजी सरपंच विद्यमान नगरसेवक,कबड्डी असोसिएशन तालुकाध्यक्ष, विविध संस्था पदाधिकारी यांच्या माध्यमातून राजू कुरूप हे लाजातील एक तगडे राजकीय ताकद असलेले व्यक्तिमत्त्व आहे.

“लांजा तालुक्यात अधिकविकास कामे करण्याची संधी मिळाली आहे पालकमंत्री उदय सामंत आणि भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली मला जी संधी मिळालेली आहे, त्याचा निश्चित फायदा लांजा ला होईल”
श्री. राजू कुरूप, नवनियुक्त डीपीडीसी सदस्य.
शिवसेना फुटीनंतर पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या सहकार्याने राजू कुरूप हे शिंदे सेना गटात प्रवेश कर्ते झाले होते. लांजा नगर पंचायत शिंदे गटाकडे सत्ता काबीज करण्यात राजू कुरूप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संभाव्य पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्या समोर ठेऊन कुरूप यांची निवड शिंदे गटाला दिलासा देणारी आहे लवकरच अनेक वजनदार कार्यकर्ते राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.














