पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा २६ मे रोजी

रत्नागिरी दि.११ (जिमाका) : रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे.

जिल्हयातील सर्व खासगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त पदे भरणेबाबत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या विभागाचे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्ते पदे नोंदवावी. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील User Id व पासवर्डचा वापर करुन Login करुन त्यांचेकडील रिक्त पदे नोंदवावित तसेच नोंदणी नसल्यास नवीन नोंदणी करीता व अधिक माहितीसाठी  कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२ – २९९३८५ / ९४२०३७७७५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE