रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार,दि.25 मे 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात उपस्थितीत “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज त्यासंदर्भातील आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.














