लांजा : एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन लांजा एसटी स्थानकात केक कापून उत्साहातसाजरा करण्यात आला. यावेळी लाल परीला सजवून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वर्धापनदिन कार्यकमला आमदार डॉ. राजन साळवी, लांजा आगार व्यवस्थापक सौ काव्या पेडणेकर, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, स्थानक प्रमुख रवींद्र खानविलकर, साईप्रसाद जुवेकर, समीर हर्डीकर, रमेश खानविलकर, अनिल वाडेकर गुरू सुर्वे, अनंत कुवेस्कर, जगदीश राजापकर आदींसह प्रवासी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त एसटी कर्मचारी यांनी लाल परीला आकर्षक फुलांनी सजविली होती. प्रवासी यांचे नव्या रूपातील रुपडे एसटी आज लक्ष वेधून घेत होती














