जहांगीर आर्ट गॅलरीतील ४३ व्या मान्सून प्रदर्शनासाठी सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट विद्यार्थ्यांची निवड

संगमेश्वर दि. २१ ( प्रतिनिधी ): देशातील नामवंत जहांगीर कलादालन याची स्थापना १९५२ साली झाली असून आज ७१ वर्षांनी देखील हे कलादालन नवोदित कलाविद्यार्थ्यांना जगासमोर प्रदर्शित करण्याची परंपरा अविरतपणे करत आहे.यासाठी हे कलादालन अनेक उपक्रम राबवित असते.दरवर्षी मान्सून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात यामधून काही निवडक विद्यार्थी यात निवडून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येते.हा त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट असते.


यावर्षी घेण्यात आलेल्या ४३ व्या मान्सून शो साठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ सावर्डे या चित्र -शिल्प कलामहाविद्यालयातील कु.ईशा राजेशिर्के,कु प्राची जोगळेकर, कु.राज वरेकर, कु.करण आदवडे यांनी पाठविलेल्या चित्रांची निवड झाली आहे.

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे सह्याद्री चित्र शिल्पकला महाविद्यालय हे राज्यातील एक अग्रगण्य कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते . येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःच्या स्वतंत्र शैलीत काम करण्यावर भर देत असल्याने त्यांना स्वतःची वेगळी ओळख प्राप्त होते . येथे केवळ अभ्यासक्रमावर आधारीत कलाशिक्षण दिले जाते असे नव्हे , तर विद्यार्थी कलाशिक्षणातून व्यावसायिक उन्नत्ती कशी साधेल यावर देखील भर दिला जातो.

कलासंचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्य प्रदर्शनासह राज्यातील विविध कला प्रदर्शनात सह्याद्री कला महाविद्यालयाचे विद्यार्थी उल्लेखनीय यश प्राप्त करीत असतात . येथे कलाशिक्षण घेऊन बाहेर पडलेले असंख्य विद्यार्थी आज नामवंत चित्रकार म्हणून स्वतःची ओळख प्राप्त करुन आहेत.

विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य. माणिक यादव व प्राध्यापकांना देत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, सकूल कमिटी सर्व सदस्य,कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE