लांजातील शिक्षकांच्या १७६ रिक्त पदांचा तिढा सोडवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लांजा : लांजा तालुक्यातील 176 प्राथमिक शिक्षक रिक्त पदांचा तिढा सुटण्यासाठी पंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू असून शून्य शिक्षकी 10 शाळांवर तातडीने कामगिरीवर शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत तर दुसरीकडे मानधन तत्वावर डीएड, बीएड आणि पदवीधर झालेले बेरोजगार उमेदवार यांना स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समिती कडून रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विध्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया बाबत अद्यापही हालचाली नसल्याने जिल्ह्यात सर्व तालुक्यात अपुऱ्या शिक्षकअभावी शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे पालकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे लांजा तालुक्यात एकूण 210 जिल्हा परिषद शाळा आहे आंतरजिल्हा बदली आणि निवृत्ती मुले केवळ 410 शिक्षक सध्या कार्यरत आहेत 176 पदे रिक्त आहेत येरवंडे, वेरळ गायधडी, आजणारी उर्दू,ह्रर्दखळे, चिचुर्डी,सालपे2, पुनस कोंड, वेरवली सुतार वाडी,सालपे 5 या 10 शाळा त शिक्षक च नसल्याने या ठिकाणी कामगिरी शिक्षक नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री बंडगर यांनी दिली.

अत्यावश्यक ठिकाणी जिल्हा परिषद शेष फंडातून 1 हजार ते 5 हजार रुपये मानधन वर स्थानिक डीएड, बीएड पदवीधर असलेले उमेदवार नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

डीएड पदवीधर नसल्यास पदवीधर उमेदवार घेण्यास सूचना दिल्या आहेत लांजा तालुक्यातील 30 नादुरुस्त शाळा प्रस्ताव जिल्हा परिषद कडे दिले आहेत नादुरुस्त शाळा बाबत पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी ही तातडीने दुरुस्ती प्रस्थाव मंजूर करण्याचे आदेश जिल्हा परिषद याना दिले आहेत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE