महाराष्ट्र एसटी स्टेट बँक निवडणुकीत कष्टकरी जनसंघाचे बंटी विश्वासराव यांचा दणदणीत विजय

लांजा : महाराष्ट्र एसटी स्टेट बँकेच्या निवडणुकीत कष्टकरी जनसंघाचे सदावर्ते पॅनेलचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग उमेदवार लांजातील भगतसिंग उर्फ बंटी विश्वासराव यांचा दणदणीत विजय झाला आहे. रत्नागिरी सिधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कामगार संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, एसटी बँक निवडणुकीत सदावर्ते पॅनेलने सर्व जागांवर उमेदवार निवडून आले असून गेल्या 25 वर्षांची सत्ता मोडीत निघाली आहे रत्नागिरी जिल्हातील सर्व एसटी आगारातील कष्टकरी जनसंघाच्या कामगारांनी जल्लोष केला आहे. कामगारांच्या एसटी संपातील असंतोषाचा हा उद्रेक असल्याची प्रतिक्रिया एसटी कामगार सभासद यांनी दिली आहे. नवनिर्वाचित संचालक बंटीविश्वासराव हे सध्या रत्नागिरी आगारात एसटी वाहक म्हणून काम करतात झर्ये मूळ गाव असलेले विश्वासराव यांनी लांजा आगारात काम केले आहे एसटी कामगारांच्या समस्या याबत कामगारांना एकत्रीत करून दाद मागण्यांसाठी विश्वास राव यांचे उभरते निस्वार्थी नेतृत्व म्हणून त्याना सदावर्ते पॅनलकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्या साठी उमेदवारी देण्यात आली होती एसटीचे विलीनीकरण सातवा वेतन आयोग यासाठी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. संप काळात एसटी कामगारांच्या मागणीला प्रतिसाद नसल्याने कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. प्रसिद्ध वकील श्री सदावर्ते यांनी कामगारांच्या आंदोलनात उडी घेऊन दिलासा आणि पाठींबा दिला होता प्रस्थापित एसटी कामगा संघटनेचे बोटचेप धोरण यावर नाराजी व्यक्त होत होत. सदावर्ते यानी कष्टकरी जनसंघ संघटनास्थापन करून नाराज एसटी कामगारांना या छताखाली आणण्यासाठी मोठे योगदान दिले त्यातून एसटी बँक निवडणुकीत प्रस्थापित संघटना राजकिय ताकद असणाऱ्या संघटना असूनही एसटी कामगारांनी या प्रस्थापित ना मोठा धक्का देत सदावर्ते पॅनेल च्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणले लांजा कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष साईप्रसाद जुवेकर यांनी सांगितले की, ही कामगारांच्या एकजुटीचा आणि असंतोषाचा विजय आहे आदरणीय सदावर्ते साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मिळवला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE