अद्वैत अभ्यंकर यांची विश्व हिंदू परिषदेचेे राजापूर प्रखंड अध्यक्ष म्हणून निवड

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर शहराच्या गुजराळी भागातील रहिवासी, समाजसेवी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व तसेच बजरंग दलाचे प्रखंड संयोजक म्हणून कार्यरत असणारे अद्वैत अरुण अभ्यंकर यांची विश्व हिंदू परिषदेने राजापूर तालुका अध्यक्ष (प्रखंड अध्यक्ष) म्हणून निवड करण्यात आली आहे.


विश्व हिंदू परिषदच्या रत्नागिरी येथे झालेल्या व्यापक जिल्हा बैठकीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या नांवाची घोषणा जिल्हा मंत्र्यांनी केली.
समाजातील सर्व स्तरांतील घटकांकडून अद्वैत अभ्यंकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि त्यांच्याकडून अधिकाधिक समाजोपयोगी कार्य व्हावे ही अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE