रत्नागिरी : मुंबई युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉप्लेक्स येथे राज्यस्तरीय तायक्वांडो पुमसे व क्योरोगी स्पर्धा दि. 30 ते 3 जुलैपर्यंत होत आहेत. या स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिग सेंटरच्या 9 खेळाडूंची निवड राज्य स्पर्धेसाठी झाली आहे. दि. 29 रोजी चिपळूण येथून जिल्हा संघ रवानाझाला आहे. प्रशिक्षक म्हणून तेजकुमार लोखंडे महिला प्रशिक्षिका म्हणून सौ. शाशीरेखा कररा काम पाहणार आहेत.
युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष कोमल सिंह व सर्व पदाधिकारी तसेच अन्नपूर्णा संगीत विद्यालय ओम साई मित्र मंडळचे अध्यक्ष श्री नंत आगाशे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. निवड झाल्याने महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी टायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वर राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, सदस्य संजय सुर्वे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
राज्य स्पर्धेसाठीनिवड झालेले कॅडेट खेळाडू पुढील प्रमाणे : स्वरा टेरवणकर, भार्गवी पवार, योगराज पवार, सई सुवरे, नुपूर दप्तरदार, अमेय पाटील, वेदांत देसाई,
अमीन बुडये, नीलाक्षी रहाठे.
वरील सर्व राज्य खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, यांच्यासह प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे महिला प्रशिक्षिका सौ शाशिरेखा कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.














