आरवली : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गावातील इल्हेव्हन स्टार आंबव (एक गाव एक संघ ) यांच्यावतीने जि. प. पू. प्रा. शाळा आंबव पोंक्षे येथे सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले.
मुलांच्या शिक्षणास मदत म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमास 11 स्टार आंबवच्या सर्व सदस्यांनी हातभार लावला.
या कार्यक्रमावेळी मुख्यद्यापिका सौ. पाटणकर व सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच 11 स्टार आंबव या संघाचे देखील सदस्य यावेळी उपस्थित होते.














