लांजात वीरशैव समाजाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : वीरशैव समाज लांजा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले गुरुपौर्णिमा निमित्ताने वीरशैव समाजाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. वीरशैव समाजाचे उत्साहात रक्तदान शिबीर पार पडले. यात एकूण 85 रक्तदात्यानी रक्तदान केले. खास करून यावेळी महिलांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

विरशैव समाजाच्या कमिटी व समाजबांधवांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रक्तदान शिबीर पार पाडले. तसेच 35 महिला व पुरुष हे बीपी प्रेशर आजारपण हिमोग्लोबिन प्रमाण अशा काही कारणास्तव रिजेक्ट झाले. यासाठी सिव्हिल हॉस्पिटल यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.

मोहन तोडकरी, प्रसाद भाईशेट्ये, नगरसेविका सौ दुर्वा भाईशेट्ये,कुंदन गांधी, शशांक उपशेट्ये सचिन लिंगायत, अतुल वासुरकर, अक्षय गांधी, मंदार सारदल,मंदार गांधी अभिषेक उपशेट्ये आदींनी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE