अलिबाग-विरार कॉरिडोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात बैठक

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी बहुउद्देशीय मार्गीकेचे मुख्य भुसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या कमिटीची बैठक पनवेल तालुक्यातील भू संपादन अधिकारी मेट्रो सेंटर 1, नवीन पनवेल कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीसाठी अलिबाग विरार कॉरीडोर बाधित शेतकरी संघर्ष समिती उरण संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर,सचिव -रवींद्र कासुकर, संघटनेचे प्रमुख सल्लागार ॲड सुरेश ठाकूर, सुधाकर पाटील,खजिनदार महेश नाईक, वसंत मोहिते,रमण कासकर, राजाराम जोशी,विजय पाटील, गोपाल जोशी, ॲड. निग्रेश पाटील, अनंत पाटील, नामदेव मढवी, विलास मढवी, जयवंत पाटील, अनिल म्हात्रे, नारायण घरत तसेच गाव कमिटीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

अलिबाग विरार कॉरीडोर चे मुख्य भूसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चा सविस्तर व व्यवस्थित पार पडली. शेवटी त्यांनी सांगितले की जिल्हा भूसंपादन नियोजन कमिटीची बैठक झाल्यानंतर आपल्या पुढील बैठकीत जमिनीच्या होणाऱ्या नुकसान भरपाई, पुनर्वसनाबाबत तसेच दरासंदर्भात कळविण्यात येईल असे भू संपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE