अतिवृष्टीमुळे २७ जुलैलाही शाळांना सुट्टी


रत्नागिरी, दि.२६ (जि.मा.का.) : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवार दि. २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.


हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओळांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या २७ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE