‘मनसे’चे युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा


मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज साहेब ठाकरे ( मनसे नेते व विद्यार्थी सेना अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी शाळेतील लहान मुलांना रेन कोट वाटप करण्यात आले.केक कापून लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व  महिलांनी पनवेल तालुका कार्यालय येथे मनसे पक्षात पक्ष प्रवेश केला.  रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष,  कैलास माळी उप तालुका  अध्यक्ष, उप तालुका सुरज गायकर,कबिरदास गायकवाड               ऊपविभाग अध्यक्ष वांवजे, अरविंद पाटिल. नितिन वाघमारे. प्रविन म्हात्रे, भरत पाटिल,दुरवास पाटील,योगेश पाटिल  अध्यक्ष तलोजा   विभाग, नितेश पाटिल, कुनाल पाटिल,प्रनय पाटिल, कातिलाल पाटिल आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकंदरीत युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE