खेड : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य व साईतारा ऑनलाइन अधिकृत एसटी आरक्षण केंद्र खेड यांचे मालक श्री.आकाश मोरे यांच्यातर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी खेड आगारा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खेड – बोरिवली मार्गास १ तसेच खेड – चिपळूण मार्गास २ या मार्गास नवीन मार्गफलक भेट स्वरूपात देण्यात आले.

मार्ग फलक एसटी आगाराला भेट देण्यासाठीच्या छोटेखानी कार्यक्रमावेळी खेड आगारचे वाहतूक नियंत्रक नागरगोजे , चालक वाहक व प्रवासी उपस्थित होते.














