गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव उत्साहात सुरू

रत्नागिरी : संस्थान श्री देव गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात दि. १६ ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भाद्रपदी गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सव कालावधीत मंदिरात श्रींची पूजा व महाप्रसाद, सहस्त्र मोदक समर्पण, कीर्तन, सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, महाप्रसाद तसेच श्रींची पालखी मिरवणूक असे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE