दिवाळीच्या सुट्टीत गौरांग कुवेसकरने साकारला सुंदर किल्ला!

संगमेश्वर : ज्ञानदीप विद्यालय बोरजमध्ये पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरांग कुवेसकर या विद्यार्थ्याने दिवाळीच्या सुट्टीत सुंदर किल्ला साकारला आहे. गेली पाच वर्षे तो दिवाळी सुट्टीत किल्ला बनविण्याचा आपला छंद जोपासत आहे.

गौरांग हा अभ्यासातही हुशार असून शाळेत विविध स्पर्धेत भाग घेऊन तो सतत यश मिळवत असतो. त्याला चित्रकलेची आवड असल्याने शालेय अभ्यास झाल्यानंतर तो नेहमीच चित्र रेखाटन करत असतो. गेली पाच वर्षे तो स्वतःच्याच बुध्दीने कोणत्या ठरावीक अशा गड किल्ल्याची प्रतिकृती न बनविता. प्रत्येक वेळी किल्ल्यांचे नवीन आकार बनविण्यावर तो भर देत असतो. किल्ले बनविताना आपल्याला आपली आई मनीषा हिचे मार्गदर्शन लाभते असे गौरांगने सांगितले.

पाना फुलांची रांगोळी घालणे याची देखील गौरांगला आवड असून आपल्या आईकडून आपल्याकडे ही कला आल्याचे गौरांगने सांगितले. गेली पाच वर्षे आपण दिवाळी सुट्टीत निगडे बोरज येथे आपल्या आईच्या महालक्ष्मी फ्यूएल या पेट्रोल डिझेल पंपात किल्ल्याची उभारणी करतो. पंपात येणारे वाहनचालक आपण बनविलेला किल्ला पाहून आपले कौतूक करतात यामुळे आपल्याला अधिक प्रोत्साहन मिळते असे गौरांगने नमूद केले. यापुढेही आपण दरवर्षी किल्ले बनविण्याचा आपला छंद जोपासणार असल्याचे गौरांगने सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE