अलिबाग : रायगड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा रथाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, खालापूर, रोहा, तळा, श्रीवर्धन, महाड या सात तालुक्यांमध्ये हा रथ जाणार आहेत.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे
