सह्याद्रीनगर साडवली येथे ५ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन

देवरूख : देवरूख येथे मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमझान महिन्याचे औचित्य साधून सुरेश ( बारक्याशेठ) बने मित्र मंडळ, देवरुख आणि प्रशांत यादव चेअरमन, वाशिष्ठी डेअरी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 05 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता स्नेहा ड्रिम्स, सह्याद्रीनगर, साडवली (देवरुख) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच मगरीब नमाज पठणचे ही नियोजन याच ठिकाणी करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन यादव व बने यांनी केले आहे.


तालुक्यात विषेशता देवरूख येथे एवढ्या मोठ्याप्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोजन प्रथमच होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE