रत्नागिरी, दि. २१ : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.

यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
