युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप

द्रोणागिरी शिवसेना, युवा सेना शहर शाखेच्या वतीने उपक्रम
उरण  16 (विठ्ठल ममताबादे) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून द्रोणागिरी शिवसेना व युवा सेनेच्या शहर शाखेतर्फे वीर वाजेकर कॉलेज फुंडे येथील विदयार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष मनोहरशेठ भोईर,शिवसेना शहरप्रमुख जगजीवन भोईर, शिवसेना संपर्कप्रमुख कल्पेश पाटिल, शिवसेना शहरसंघटक किसन म्हात्रे,सरपंच अमित भगत, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रुख करण पाटिल, धनंजय शिंदे, सोमनाथ भोईर, अंकुश चव्हाण, अशोक पाटील, संजय कापसे, सन्नी पार्टे, रविना ठाकुर, अंकिता घरत, सुरेखा भोईर तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.द्रोणागिरी शहर शिवसेना, युवासेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE