देवरुख-साखरपा मार्गावर वाहनाची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू

देवरूख( सुरेश सप्रे ) : देवरूख-साखरपा या राज्य मार्गावर देवरूख येथिल कांजीवरा परिसरातील रमाकांत साडविलकर यांच्या घरासमोर पहाटे ५.३० ते६.००चे दरम्यान बिबट्या मृत्यू अवस्थेत सापडला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा बिबट्या मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

देवरुख-साखरपा या मुख्य रस्त्यावर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याबाबत संजय रमाकांत साडविलकर यांनी वनपाल देवरुख यांना दूरध्वनी वरुन कळवल्यानुसार घटनेबाबत परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना कळवुन वनपाल तौफिक मुल्ला यांनी वनरक्षक सहयोग कराडे, अरुण माळी, सुरज तेली यांच्या समवेत तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

साडविलकर यांचे राहत्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याबाबत बारकाईने पाहणी करता हा बिबट्या नर जातीचा पूर्ण वाढीचा अंदाजित वय 6 वर्षे वयाचा आहे. हा बिबट्या हा रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत झाला असावा, असे दिसून आले

घटनास्थळी मृत बिबट्याचे विविध फोटो घेऊन संशयास्पद काही मिळते का याबाबत सुमारे पाचशे मीटर अंतरात बारकाईने पाहणी केली असता मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करून घटनास्थळी चा पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृत बिबट्या वन विभागाच्या ताब्यात घेऊन या बिबट्यास देवरुख येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांच्यामार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सदर बिबट्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेत झाला असावा, असे सांगितले

गेले अनेक दिवस देवरूख शहरातील विविध ठिकाणी भर दिवसा बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसून येते होते. त्यामुळे नागरिक भितीदायक वातावरणात वावरताना दिसत होते. बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले. सदर कामगिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल तौफिक मुल्ला ,व वनरक्षक यांनी केली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE