निवडणूक कालावधीत नागरिकांनी सी-व्हिजील, एनजीएसपीसह १९५० टोल फ्री सुविधांचा वापर करावा


खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांचे आवाहन

रत्नागिरी, दि. १७ : जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी अथवा पक्षांनी मतदारांना कोणतेही प्रलोभन, कोणतेही साहित्य वाटप करीत असल्याचे तसेच कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास सी-व्हीजील, एनजीएसपी व टोल फ्री क्रमांक 1950 या भारत निवडणूक आयोगांनी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन त्वरित तक्रार अथवा माहिती देण्यात यावी, असे आवाहन खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत होण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक शांततेत तसेच पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE