रत्नागिरी : सारथी विभागीय कार्यालय उपकेंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर (करिअर टॉक) 17 डिसेंबर रोजी मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे, तरी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. स्वत:ला ओळखा व करिअर निवडा, ताणतणाव व्यवस्थापन अभ्यास कौशल्य, परिक्षा सामोरे जाताना, या विषयांवर विठ्ठल कोतेकर हे समुपदेशन करतान आहे. तर विज्ञान शाखेतील करिअर, वाणिज्य क्षेत्रातील करिअर या विषयावर विक्रांत जाधव आणि कला शाखेतील करिअर ललित कला क्षेत्रातील करिअर या विषयांवर चौगुले इ. एन हे समुपदेशन करणार आहेत. त्यांनतर विद्यार्थी, पालक शंखा समाधान आणि दुपारी 3 वाजता या शिबिराचे समारोप होणार आहे.
