सावंतवाडी-मुंबई आणखी एक विशेष गाडी धावणार

रत्नागिरी :  सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गे सावंवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान तिसरी विशेष गाडी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही गाडी (01134) सुटणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वा. 25 मिनिटांनी लो. टिळक टर्मिनसला पोहचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01133) दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटून सावंतवाडीला ती त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहचणार आहे.
ही आंगणेवाडी स्पेशल गाडी एकूण 20 एलएचबी डब्यांची धावणार आहे. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबे घेणार आहे.
एकूण 20 डब्यांची ही गाडी एलएचबी श्रेणीतील असेल. यात टू टायर वातानुकूलित 1, थ्री टायर वातानुकुलित 3, थ्री टायर इकॉमी वातानूकुलित 2, स्लीपर 8, सर्वसाधारण श्रेणीतील चार, जनरेटर कार एक तर एसएलआर एक अशी कोचरचना असेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE