कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी पाच विशेष गाड्या जाहीर

मुंबई,नागपूर, पुणे तसेच पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर धावणार
विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरू


रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पाच विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, पनवेल तसेच पुणे येथून या गाड्या कोकणात धावणार आहेत.
या बाबत कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी, नागपूर -मडगाव पुणे कुडाळ पुणे टीव्ही तसेच थीवी -पनवेल मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत.
गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये 01137/01138 ही गाडी 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत दररोज धावणार आहे. नागपूर -मडगाव ही गाडी आठवड्यातून दोनदा धावणार आहे. दि.24 ऑगस्टपासून ही गाडी सुरू होणार आहे.

तिसरी विशेष गाडी पुणे ते कुडाळ या मार्गावर धावणार आहे 01141/01142 या क्रमांकाने धावणारी ही गाडी 23 ऑगस्टपासून साप्ताहिक पद्धतीने चालवली जाणार आहे.
थीवी ते पनवेल या मार्गावर धावणारी गाडी 01145/011 46 या क्रमांकाने साप्ताहिक पद्धतीने लावणार आहे ही गाडी 26 ऑगस्ट पासून कोकण रेल्वे मार्गावर जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी धावणारी पाचवी विशेष गाडी गोव्यातील थीवी ते पनवेल स्थानकादरम्यान धावणार आहे. 011 44 /01143 या क्रमांकाने धावणारी ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. दिनांक 27 ऑगस्ट पासून ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या या गाड्यांचे आरक्षण दिनांक 4 जुलैपासून खुले होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE