रोहा-चिपळूण मेमूच्या फेर्‍या 9 सप्टेंबरपर्यंत वाढवल्या

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण दरम्यान सुरु करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेर्‍या दि. 6 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईला परतणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी गणेशोत्सवासाठी प्रथमच दिवा – रोहा – चिपळूण (01157/01158) अशी मेमू ट्रेन सुरु करण्यात आली आहे. दीड दिवसांचा गणेशोत्सवा आटोपून चाकरमान्यांची परतीची लगबग सुरु झाल्याने होत असलेली गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने मेमू ट्रेनच्या फेर्‍या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE