उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : 17 जुलै 2022 मध्ये झालेल्या NEET UG परीक्षेत गव्हाण कोपर तालुका पनवेल ची कन्या सुदेशना प्रल्हाद पाटील हिला 720 पेक्की 694 गुण प्राप्त होऊन संपूर्ण देशामध्ये (all india rank 364) 364 वी रँक मिळाली. तसेच ओ बी सी कॅटेगरीत 75 वा क्रमांक आला
या परीक्षेसाठी 18 लाख विद्यार्थी बसले होते. तिच्या ह्या यशामध्ये तिचे आई मनीषा पाटील, वडील प्रल्हाद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अनअकॅडमि कोचिंग क्लासेसच्या योग्य मार्गदर्शनामुळे तिने हे यश संपादन केले आहे .तिच्या या यशा बदल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब असून मिळालेल्या यशाबद्दल पाटील परिवाराने मोठया जल्लोषात आनंद व्यक्त केला आहे.















