खुशखबर !!! मुंबई -मडगाव ‘कोकणकन्या’ होणार सुपरफास्ट!

एकूण प्रवासात होणार तब्बल दोन तास दहा मिनिटांची बचत


रत्नागिरी दि.१९ सप्टेंबर : कोकण रेल्वेमार्गे रोज धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस दि. 20 जानेवारी २०२३ सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.दि.20 सप्टेंबरपासून कोकणकन्या विद्युत इंजिनसह धावणार असल्यामुळे नवीन वर्षात हा बदल करण्यात आला आहे. यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसच्या एकूण प्रवासात तब्बल दोन तास दहा मिनिटे बचत होणार आहे.


कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिन सहचालवला जाणार आहेत.
कोकणकन्या एक्सप्रेस आतापर्यंत 10112 व 10111 या क्रमांकासह धावत होती. आता दिनांक 20 जानेवारी २०२३ ही गाडी डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर धावणार असून एक्सप्रेस ऐवजी ती आता सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून लावणार आहे. या गाडीचा क्रमांक देखील बदलला असून आता वेगवान झालेली कोकणकन्या एक्सप्रेस 20111/ 20112 या क्रमांकासह धावेल.
ही गाडी आतापर्यंत मडगाव येथून सायंकाळी 4 वाजून पन्नास मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईतील सीएसएम टी स्थानकावर पोचत होती. नवीन वर्षात ही गाडी मडगाव येथून दोन तास दहा मिनिटे उशिराने सुटणार. दिनांक 20 जानेवारीपासून ही गाडी मडगाव येथून सायंकाळी 4.50 ऐवजी सात वाजता सुटणार आहे. असे असले तरी मुंबईत सीएसएमटी स्थानकावर ती आधीच्याच पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे. थोडक्यात कोकणकन्या एक्सप्रेस विजेवर धावणार असल्याने तिच्या एकूण प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत झाली आहे.

सुपरफास्ट कोकण कन्या एक्सप्रेस दिनांक 20 जानेवारीपासून सावंतवाडीला रात्री आठ वाजून 36 मिनिटांनी, कुडाळला रात्री 08:58 यांनी कणकवलीला रात्री नऊ वाजून 28 मिनिटांनी, राजापूरला 10:14 मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्री नंतर एक वाजून 28 मिनिटांनी तर खेड्लाती ती रात्री १ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल.
मुंबई सीएसएमटीहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस 20111 आधीप्रमाणे रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटणार असून पनवेल पर्यंत या डाऊन गाडीच्या वेळापत्रकात बदल झाला असला तरी गाडी स्पीडअप झाल्यामुळे खेड स्थानकावर ती आधीच्या पहाटे तीन वीस ऐवजी तीन वाजून चार मिनिटांनी येईल. चिपळूणला कोकण कन्या एक्सप्रेस आधी 03:58 न्यायची मात्र आता ती सुपरफास्ट झाल्यामुळे तीन वाजून 30 मिनिटांनी येईल. संगमेश्वरला डाऊन कोकणकन्या आधी पहाटे चार वाजून 38 मिनिटांनी यायची आता ती चार वाजून दोन मिनिटांनी येईल. सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर पूर्वीच्या पाच-पंचवीस ऐवजी चार वाजून पंचवीस मिनिटांनी येईल. मुंबईवरून येताना कणकवलीला पूर्वी कोकणकन्या एक्सप्रेस 07:52 आणि पोहोचायची आता जानेवारी पासून ती सहा वाजून 43 मिनिटांनी पोहचेल. पूर्वी कोकणकन्या एक्सप्रेस दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचत असे. सुपरफास्ट झाल्यावर ती दुपारी ऐवजी सकाळी 09:46 मडगाव ला आपला प्रवास संपवणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE