हापा-मडगाव एक्सप्रेसला उद्यापासून स्लीपरचा एक डबा वाढवणार


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा – मडगाव (22908/23907) एक्सप्रेस स्लीपर श्रेणीचा एक डबा दिनांक 21 सप्टेंबर पासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हापा ते मडगाव दरम्यान या गाडीला दिनांक 21 सप्टेंबर पासून तर मडगाव ते हापा या फेरीसाठी या गाडीला दिनांक 23 सप्टेंबरपासून स्लीपर चा एक डबा तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी असलेल्या गाड्यांना डबे वाढवले जात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्याना दिलासा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE