मुंबई, २१ सप्टेंबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शुभांगी पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ उपस्थित होत्या.















