लांजानजीक गॅस टँकर नदीत कोसळून चालक ठार

दुर्घटनाग्रस्त टँकर भारत पेट्रोलियमचा

मुंबई-गोवा महामार्ग अंजणारी पुलावरील दुर्घटना

नाणीज : मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी येथील पुलावरून भारत पेट्रोलियचा गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी दोन तीस वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मृत चालकाचे नाव प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) असं आहे.

टँकर क्रमांक MH-12LT-6488 घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता अंजणारी येथील घाटी उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर नदीत कोसळला त्यामुळे चालकाचा बुडून मृत्यू झाला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने मयत चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोच केले काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती
हातखंबा येथील वाहतूक शाखेचे पोलीस, लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE