रत्नागिरी दि. २३ सप्टेंबर : पश्चिम रेल्वेच्या मार्गावर राजकोट डिव्हिजनमध्ये सुरू असलेल्या अपग्रेडेशनच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या हापा -माडगाव एक्सप्रेसच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेच्या राजकोट डिव्हिजन मध्ये दिनांक 2३ ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत हापा -माडगाव (22908/22907) तसेच मडगाव -हापा या दोन फेऱ्या पूर्णता रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. हापा- मडगाव दरम्यानची दिनांक 28 सप्टेंबरची तर मडगाव ते हापा दरम्यान सुटणारी दिनांक 30 सप्टेंबरची गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.















