मयेकर महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

रत्नागिरी : तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे सामाजिक शास्त्र मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संचालक श्री सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. स्नेहा पालये आदी मान्यवरांच्या हस्ते या महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणेश कुलकर्णी सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. कविता जाधव, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अवनी नागले, प्रा राजेश धावडे प्रा. शामल करंडे, प्रा. गुरुनाथ सुर्वे, प्रा. तेजश्री रेवाळे, प्रा. दिपाली सावंत आदी प्राध्यापक, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE