भक्तांच्या हाकेला धावून येणारी कोप्रोली कोळीवाड्यातील आई एकविरा देवी

उरण दि. ५ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील पूर्व विभागात कोप्रोली गावातील कोळीवाड्यात आई एकविरा देवीचे मंदिर असून भक्तांच्या हाकेला धावून येणारी माता, देवी म्हणून प्रसिद्ध आहे. सदर मंदिरांची स्थापना 25 मार्च 1996 साली झाली असून नवरात्रात दररोज विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम येथे राबविले जातात. लावणी,पैठणी, दांडिया,फॅन्सी ड्रेस अशा कार्यक्रमांचे आयोजन नवरात्रात करण्यात आले.

आई एकविरा देवी मंदिर ट्रस्ट कोप्रोली काळीवाडा व ग्रामस्थ एकत्र येऊन सण साजरे करतात. एकत्र येऊन विविध कार्यक्रमाला हातभार लावतात. आगरी कोळी तसेच सर्व समाजाच्या भाविक भक्तांच्या हाकेला पावणारी आई एकविरा देवीचा नवरात्रौत्सव कोप्रोलीमधील कोळीवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE