मंडणगड : मंडणगड आगरातर्फे मंडणगड तिडे तळेघर बोरिवली एसटी फेरी दि. २ ऑक्टोबरपासून नियमित सुरू करण्यात आली आहे.
ही बस कुंबळे तिडे तळेघर सडे चिंबावे महाड पनवेल सायन अंधेरी मार्गे बोरिवली जाईल. ही बस मंडणगड येथून सकाळी ८.१६ वाजता सुटणार असून परतीच्या प्रवासासाठी रात्री ८.१६ वाजता बोरिवली येथून सुटणार आहे व दापोली पर्यंत जाईल.

तरी प्रवाशांनी या फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक मंडणगड व तिडे तळेघर ग्रामपंचायत,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी समिती शेगांव सदस्य ऍड. पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी समिती शेगांव सदस्य व तरूण भारत पत्रकार संजय त्रिवेदी, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. सौ. शबनम शेख, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत यांच्यातर्फे करण्यात आले आहे.














