किल्ले मर्दनगडावर दसरादिनी सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन

मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवाराचा उपक्रम

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या अनुषंघाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या आवरे येथील मर्दनगड किल्यावर मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवारातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने व श्रध्देने साजरा करण्यात आला.

मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरण बांधून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दनगडाचे पूजन केल्यानंतर भगवा ध्वज फडकविण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशिक ठाकूर, शंकर पाटील, दिलेश ठाकूर, विजय गावंड, दिपेश ठाकूर, सुजित ठाकूर, तुषार म्हात्रे, मयुरेश पाटील, संजित भोईर, ओंकार गुलप, प्रशांत अत्तिरकर,सुदर्शन घवाळी, शिर्के, नितीन बोडेकर, सुनील दिव, प्रसाद खैरणार डोंबिवली, कल्पेश भोकरे, अक्षय धुरी, स्वरांग ठाकूर, स्पंदन ठाकूर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE