विजयादशमीनिमित्त पालखी प्रदक्षिणा मिरवणूक
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीच्या मंदिरात विजयादशमीनिमित्त श्रींच्यासमोर फुलांच्या पाकळ्यापासून आपट्याच्या पानाची आरास तयार करण्यात आली होती. गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरातील मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी ही आरास केली होती.
विजयादशमीनिमित्त गणपतीपुळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी व आपट्याची पाने अर्पण करण्यासाठी दिसून येत होते. त्यामुळे ग्रामस्थांना आपट्याची पानांची आरास पाहायला मिळाली तसेच विजयादशमी निमित्त सायंकाळी श्रीची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गणपतीपुळे गावातील आपटा तिठा या ठिकाणी असलेल्या आपट्याच्या झाडाची पालखी समवेत जाऊन पूजाअर्चा करण्यात येते व त्या नंतर येथील झाडाची पाने (सोने) लुटले जाते येथील पाने हे कुणालाही न देता येथील ग्रामस्थ सदरची पाने आपल्या पेटीत तिजोरीत देवाच्या ठिकाणी ठेवली जाण्याची प्रथा असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी सांगितले


















