रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल ९५ टक्के
रत्नागिरी : ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत रत्नागिरी येथील आयटीआयचा निकाल 95 टक्के लागला आहे. या परीक्षेत सुईंग टेक्नॉलॉजीमध्ये सफापरवीन मजगावकर ही राज्यात प्रथम क्रमांकाने तर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायात ओंकार प्रकाश आंबरे हा 90 टक्के गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. रत्नागिरी आयटीआयच्या या उज्वल यशासाठी पल्लवी साखरकर तसेच मंदार शेलार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
रत्नागिरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या कौशल्य दीक्षांत समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या प्रकारात महाराष्ट्र राज्यात दुसरा आलेला ओंकार आंब्रे तसेच सुईंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेल्या सफापरवीन मजगावकर या दोघांचा सत्कार करण्यात आला.















