दिवाळीसाठी वाढती गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेची घोषणा
रत्नागिरी : दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरुन धावार्या दोन्ही डबल डेकर एक्स्प्रेस गाड्यांना प्रत्येकी चार वातानुकूलित डबे वाढण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस (11099/11100) वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचे चार डबे, तर 11085/11086 या दुसर्या डबल डेकर एक्स्प्रेसला वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचे चार अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. यामुळे या दोन्ही डबल डेकर एक्स्प्रेस 16 डब्यांच्या धावणार आहेत. रेल्वने दिलेल्या माहितीनुसार यातील 11099 या गाडीला हा बदल दि. 15 ते 29 ऑक्टोबर दरम्यान दर शनिवारसाठी तर 11100 या गाडीसाठी दि. 16 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत रविवारसाठी राहणार आहे. त्याचबरोबर 11085 या गाडीसाठी हा बदल दि. 17 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी सोमवार तसेच मंगळवारी धावणार्या डबल डेकरला लागू असेल. तर मडगाव ते लो. टिळक टर्मिनस दरम्यान धावणार्या डबल डेकरला दि. 18 ऑक्टोबर ते दि. 1 नोव्हेंबर या कालावधीहसाठी लागू राहणार आहे.















