अंत एका ध्यास पर्वाचा!

नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांची चिपळुणात आज शोकसभ

चिपळूण : सामाजिक क्षेत्रात थोर कार्य केलेले, इतिहासाचे नामवंत अभ्यासक-संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे नुकतेच (मंगळवार, दि. ११) हृदयविकाराने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. कोकण इतिहास संशोधन क्षेत्रात थोर कार्य करणाऱ्या अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (रविवार दि. १६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ‘शोकसभा’ आयोजित करण्यात आली आहे.

तसेच गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फेही आज सकाळी १० वाजता संस्थेच्या वरवेली (चिरेखाण फाटा) येथील कार्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अण्णा संस्थापक-सल्लागार होते.

अण्णांचे अखेरच्या दहा दिवसांचे वास्तव्य ज्या वास्तूत होते, त्या आरती निराधार सेवा फौंडेशनच्या मालघर संकुलातही काल (दि. १५) सायंकाळी अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्वर्गीय अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज वाटेकर, चिपळूण

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE