८४ वे कवी संमेलन उत्साहात संपन्न

कोकण मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील विमला तलाव (गार्डन )येथे प्रत्येक महिन्यातील 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मधुबन कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )च्या माध्यमातून कवी संमेलन भरविले जाते. यावेळी सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी विमला तलाव (गार्डन ) येथे ८४ वे कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले. यावेळी कवी, साहित्यिक यांच्यासह जेष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष-चंद्रकांत मुकादम,स्वागताध्यक्ष – राम म्हात्रे होते.समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मोहनलाल म्हात्रे, बल्लाळ श्रीराम वैशंपायन यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित कवी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील,संजय होळकर,भ पो म्हात्रे,अनंत पाटील, कवीश्री अरूण म्हात्रे,सी. बी. म्हात्रे,भालचंद्र म्हात्रे,राम म्हात्रे,मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी सुंदर अशी कविता सादर करून रसिक प्रेषकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कवी मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.एकंदरीत 84 वे कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE