दिवाळीमुळे गर्दी वाढल्यामुळे रेल्वेचा निर्णय
रत्नागिरी : दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत रेल्वेने या मार्गावरून धावणाऱ्या जामनगर- तिरुनलवेली या गाडीला स्लीपर श्रेणीचा एक डबा तात्पुरत्यासह स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी रेल्वेने कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवली आहे. विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्याबरोबरच काही नियमित रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये रेल्वेने वाढ केली आहे.
यानुसार रेल्वेने १९५७८ /१९५७७ या जामनगर ते तिरूनेलवेली मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला शयनियान श्रेणीचा एक डबा वाढवला आहे. जामनगर ते तिरुनेलवेली धावताना दिनांक 21 व 22 ऑक्टोबर तर तिरुनेलवेली ते जामनगर या मार्गावर धावताना दिनांक 24 व 25 ऑक्टोबर च्या फेरीला स्लीपर श्रेणीचा वाढदिवस ला जाणार आहे.
















