उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : दिवाळीला सुरुवात झाली असली तरीही ग्राहकांचा कल मिठाईकडे कायमचा आहे. दिवाळीत मिठाई एकमेकांना भेट दिली जाते. अनेक कंपन्या दिवाळी निमित्त गोड पदार्थ आपल्या कामगारांना भेट देत असतात. ड्रायफ्रुटला सुद्धा दिवाळी सणात मोठी मागणी असल्याचे दिसून येते. गेली दोन वर्षे कोरोना असल्याने नागरिकांना आपल्या मनासारखी दिवाळी साजरी करता आली नाही. गेल्या वर्षी मिठाई बर्फीच्या दुकानात गर्दी सुद्धा कमी होती. यावेळी महागाई मोठ्या प्रमाणात असली तरीही मात्र मिठाई, बर्फीच्या दुकानात फार मोठी गर्दी पहावयास मिळत आहे .
आम्ही अनेक वर्षापासून मिठाई विक्रीचा व्यवसाय करत आहोत. सर्व प्रकारचे हलवा, काजू कत्री, मिठाई,काजू कतली, केसर कतलीचॉकलेट कतली, गुलाब जाम मिठाई आमच्याकडे उपलब्ध आहेत. कोरोनामुळे नागरिकांना दिवाळी सारखे चांगले सण साजरा करता आले नाहीत यंदा मात्र लोकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर झाली आहे.
यंदाची सर्वांची दिवाळी आनंदाची व भरभराटीची जाईल असे उरण मधील प्रसिद्ध मिठाईवाले हॉटेल बालाजी स्वीट्स कॉर्नर या मिठाईच्या दुकानाचे कैलास सतेरे यांनी सांगितले. उरण शहरातील लालमैदान समोर, आनंद नगर जवळ असलेल्या हॉटेल बालाजी स्वीट्स कॉर्नर मिठाईच्या दुकानात उत्तम क्वालिटी लीटी बर्फी पेढे मावा, गोड खाद्यपदार्थ, ड्रायफ्रुटस मिळत असल्याने हॉटेल बालाजी स्वीट्स कॉर्नर या दुकानात दिवाळी निमित्त ग्राहकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.















