माजी आ. मनोहरशेठ भोईर यांचा बीपीसीएल कंपनीत नोकरीसाठी उपोषण करणाऱ्या अविनाश ठाकूर यांना पाठिंबा

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बी पी सी एल कंपनीसाठी जमीन संपादित करून सुध्दा नोकरी न देणाऱ्या बी पी सी एल कंपनीच्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण करणाऱ्या अविनाश रमण ठाकूर यांच्या उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मंगळवार दि. 25 ऑक्टोबर 2022 रोजी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे )उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत , पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील,कामगार नेते भूषण पाटील, जेष्ठ कायदेतज्ज्ञ डी के पाटील, प्रा एल बी पाटील, विधी सेलचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र घरत, युवासेनेचे अवचित राऊत, गौरव म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक,रमाकांत म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सिमा घरत, डोगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, आनंदनगर शाखाप्रमुख मणीराम पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अविनाश ठाकूर यांना सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्याला बीपीसीएल कंपनीने त्वरित कामावर घ्यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE