रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत नेण्यासह दादर- चिपळूण नवीन गाडीची मागणी
मुंबई : जल फाउंडेशन, कोकण विकास समिती, गोराई महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था असोसिएशन मर्यादित, खेड तालुका रहिवाशी मंच मुंबई, खेड तालुका रहिवासी मंच दिवा, आधार फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्थांनी कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसंबंधी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात गुरुवार दि. २७ ऑक्टोबर, २०२२ सकाळी १० वाजता भेट घेऊन कोकण रेल्वे प्रवासी जनतेच्या दृष्टीने हिताच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.



यावेळी खासदार गोपळा शेट्टी यांच्याकडे पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
१. दादर चिपळूण नियमित गाडी सुरु करणे
२. पश्चिम रेल्वेवरून सावंतवाडीकरिता नियमित गाडी सुरु करणे
३. पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे दादरपर्यंत चालवणे
४. पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी १०१०५/१०१०६ सावंतवाडी एक्सप्रेस एक्सप्रेस दादरपर्यंत चालवणे
५. १२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, १२६१७/१२६१८ मंगला एक्सप्रेस, २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस, २२११३/२२११४ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस, २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्सप्रेस, १२२०१/१२२०२ गरीबरथ एक्सप्रेस, २२६३० तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस, १२१३४ मंगळुरु मुंबई एक्सप्रेस व २२४७५/२२४७६ कोईम्बतूर हिसार एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे
या भेटीदरम्यान खासदार गोपाळ शेट्टी यांनी कोकण वासी यांच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात तातडीने लक्ष घालून रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री श्री. रावसाहेब दानवे तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोंकण विकास समितीचे वतीने गुरुवारी भेट घेऊन अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी सक्रिय सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी यांना पाठविले होते तसेच जल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. नितीन जाधव व त्यांच्यासोबत श्री. सुखदेव गायकवाड, श्री.संदेश कदम, श्री. निलेश पाटणे, श्री. संतोष निकम, श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. सुरेश जाधव, श्री. किरण बागल, श्री. मनोहर पवार, श्री. अशोक उतेकर, श्री. संजय निकम, श्री. नितीन माईल, श्री. तुकाराम निकम, श्री. चंद्रकांत सकपाळ व इतर कार्यकर्ते सदर वेळी उपस्थित होते; ज्या सर्वांनीच सकारात्मक चर्चा करून कोकणचे रेल्वे प्रश्नांवर पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती खासदारांना केली आहे.














