दापोलीत ६ नोव्हेंबरला ‘विंटर सायक्लोथॉन’ स्पर्धेचे आयोजन

भाग्यवान सोडतीमध्ये १ लाखाची बक्षिसे, दोन सायकली खूप काही

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ६ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२२ चे आयोजन केले आहे. ही सायकल स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे.

ही स्पर्धा सिटी शॉर्ट रुट आणि कोस्टल सिनीक रुट अशी २ मार्गावर असून यासाठी प्रवेश शुल्क ३०० व ४०० रुपये आहे. सिटी शॉर्ट रुट मार्ग आझाद मैदान- केळसकर नाका- नर्सरी रोड- नवभारत छात्रालय- पांगारवाडी जालगाव – लालबाग – उदयनगर – आझाद मैदान असा ५ किमीचा असून यावर फेऱ्या मारुन ५ ते ७५ किमी अंतर पूर्ण करता येणार आहे. कोस्टल सिनीक रुट मार्ग आझाद मैदान दापोली- उंबर्ले- ओळगाव- बुरोंडी- लाडघर- कर्दे- मुरुड- सालदुरे- पाळंदे- हर्णै- पाजपंढरी- आसूद- दापोली असा ७५ व ५० कि.मी.चा असेल. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

या स्पर्धकांमधून लकी ड्रॉद्वारे बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी २ सायकल, हेल्मेट अशी १ लाखाची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत. सायकल राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, एनर्जी स्नॅक्स, ऍम्ब्युलन्स मेडिकल मदत असेल.

स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी https://www.townscript.com/e/dapoli-winter-cyclothon-2022 या लिंक वर करता येईल तर ऑफलाईन नोंदणी फॉर्म १. समर्थ कुशन एजन्सी, अर्बन कॉलेजजवळ, २. सुनिल ऑटोमोबाईल ३. विनी इलेक्ट्रिकल, फॅमिली माळ, ४. श्री सायकल शॉप या ठिकाणी भरता येतील.

अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव ८६५५८७४४८६, पराग केळसकर ९४२२४३३२९१ यांना संपर्क करु शकता. या स्पर्धेत पुणे, मुंबई, सातारा अशा अनेक ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. तसेच दापोलीतील अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस इत्यादी तंदुरुस्त आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, सायकल चालवत सहभागी होणार आहेत. यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असेल असे आयोजकांनी सांगितले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE