कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : जल फाउंडेशन कोकण विभाग, कोंकण विकास समिती आणि इतर सामाजिक संस्थांनी कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसंबंधी श्री.अविनाश राणे यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांची चेंबूर येथील त्यांच्या कार्यालयात शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर, २०२२ दुपारी ३ वाजता भेट घेतली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यापुढे पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
१. दादर चिपळूण नियमित गाडी सुरु करणे
२. दिवसा चालणारी व प्रत्येक तालुक्यात थांबणारी दादर सावंतवाडी गाडी सुरु करणे
३. पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे दादरपर्यंत चालवणे
४. पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी १०१०५/१०१०६ सावंतवाडी एक्सप्रेस एक्सप्रेस दादरपर्यंत चालवणे
५. १२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस,
१२६१७/१२६१८ मंगला एक्सप्रेस,
२२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस,
२२११३/२२११४ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस,
२२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्सप्रेस,
१२२०१/१२२०२ गरीबरथ एक्सप्रेस,
२२६३० तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस,
१२१३४ मंगळुरु मुंबई एक्सप्रेस व २२४७५/२२४७६ कोईम्बतूर हिसार एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे

या भेटी वेळी खासदार शेवाळे यांनी तातडीने लक्ष घालून रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री श्री. रावसाहेब दानवे तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर, उपाध्यक्ष प्रभानंद शंकरराव रावराणे, श्री अक्षय मधुकर महापदी, विजय बाळकृष्ण रावराणे, श्री विलास पांडुरंगराव मोरे, अनंत पांडुरंग भोसले,
जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितिन सखाराम जाधव ,
श्री. सुखदेव सखाराम गायकवाड, शिवाजी कदम व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
या सर्वांनीच सकारात्मक चर्चा करून कोकणचे रेल्वे प्रश्नांवर पूर्तता करणेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE