शिवा संघटनेच्या श्री क्षेत्र कपिलधार मधील राज्यव्यापी मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन

उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे ) : कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त शिवभक्तांचे श्रध्दास्थान, वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता .जिल्हा- बीड (महाराष्ट्र) येथे सोमवार दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता 21 वे शासकीय महापूजा व त्या नंतर लगेचच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातून 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवातीर्थ मैदानावर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी व शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे.

मुंबई, नवी मुंबई व कोकणातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी श्री क्षेत्र कपिलधार(जिल्हा बीड )ला जाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांच्या फोन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुपेश होनराव(डोंबिवली )-9892869039

नारायण कंकणवाडी(पनवेल )-
9594862000

विनायक म्हमाने (रायगड )-9967544387

शांतेश्वर गुमते (पालघर )-8390908146

शिवा बिराजदार (ठाणे जिल्हा )-9820535330

डी एम कोराळे (नवी मुंबई )-9987030967.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE